Posts

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

सरदार वल्लभभाई पटेल यांना धोडंबे विद्यालयात अभिवादन भारताचे लोहपुरुष, पहिले गृहमंत्री, माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती विदयालयात साजरी करण्यात आली.ह्यावेळी ग्रामस्थ तानाजी शिवाजी जाधव व रामदास परदेशी यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. ह्यावेळी मा. मुख्याध्यापक एस एम वंजारी सर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की सरदार पटेल यांचे राष्ट्रीय चळवळीपासून ते स्वातंत्र्यापर्यंतचे व स्वातंत्र्यांनंतरचे ही योगदान विसरता येणार नाही.1947 मध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात 560 हून अधिक छोटी-मोठी संस्थानं होती.काही संस्थानं भारतात सामील होण्याच्या विरोधात होती.परंतु सरदार पटेलांनी आपल्या तल्लख नेतृत्व क्षमतेने या संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केले व देशाची फाळणी रोखली. ह्यावेळी जेष्ठ शिक्षक रकिबे के के, शिंदे बी एल, गायकवाड एस एच, थोरात आर के, जाधव एस एस, पवार एस एस, शेवाळे के एन, पाटील एस बी, बागुल आर आर, महाजन जी डी, ठाकरे एस ए आदी उपस्थित होते